संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात File Photo
मुंबई

Maharashtra Interim Budget 2024|राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात विविध घोषणांचा पाऊस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. वारकरी, शेतकरी आणि महिला तसेच समाजातील इतर घटकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना २० लाखांच्या ऐवजी २५ लाख रुपये आर्थिक मदत देणार.

ओबीसी, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींना मोफत शिक्षण

व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींना १०० % शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती. सुमारे २ लाख मुलींना याचा लाभ मिळणार.

तृतीयपंथीयांचा शासकीय भरतीत समावेश करण्यात येणार

गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान

१ जुलै २०२४ पासून गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान. बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति पीक १७५ रुपये अनुदान देणार. नंदुरबार जिल्ह्यापासून योजनेची सुरुवात.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी १० लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर. या अंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा १० हजार रुपये विद्या वेतन देणार.

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र कुटुंबांना दरवर्षी ३ सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. महिलांना रिक्षा खरेदीसाठी १० हजार रुपये निधी देण्यची घोषणा करण्यात येणार आहे.

गाव तिथे गोदाम योजना

शेतकऱ्याच्या मालासाठी गाव तिथे गोदाम ही योजना राबविण्यात येणार आहे. नवीन गोदामाचे बांधकाम आणि जुन्याची डागडुजी करण्या साठी निधी दिला जाईल. पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांची निर्मिती. कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना खरीप पणन हंगाम २३-२४ मध्ये २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचं अर्थसहाय्य देणार.

स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी..

खरीप हंगाम २०२३ करता ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर विभागामध्ये चाचणी केलेली ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणार. राज्यातील  शेतकऱ्यांना १ रूपयात पीक विमा योजाना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप देणार. ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी प्रति हेक्टर 5000 रुपये बोनस देणार.

२५ लाख महिलांना लखपती दिदी करणार

राज्यातल्या १५ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून चालू आर्थिक वर्षात २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करणार. नवी मुंबईमध्ये युनिटी मॉल बांधण्यात येणार.

शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शुभमंगल योजनेतील रक्कम १० हजारांहून २५ हजार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद. जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या या योजनेत पात्र महिलांना प्रतिमाह १५०० रुपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ स्थापण करण्यात येणार. प्रतिदिंडी २० हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वारीतील प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत. निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT