Stralink in Maharashtra
मुंबई : ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारने आज (दि. ५) स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत लेटर ऑफ इंटेंट (LoI) वर स्वाक्षरी केली. उपग्रह-आधारित इंटरनेट सेवांसाठी एलोन मस्कच्या स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. दरम्यान, पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि डॉ. प्रतापसिंह ग. जाधव यांच्या सिंहायन या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टारलिंकबरोबर करार होणार असल्याचे सूतोवाच केले होते.
सरकारी संस्था, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिमसह वंचित जिल्ह्यांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट तैनात केले जाईल. हे पाऊल राज्याच्या डिजिटल महाराष्ट्र मोहिमेचा एक भाग आहे आणि मर्यादित नेटवर्क सुविधा असलेल्या भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, हा महाराष्ट्रासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही आयसीटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या संवाद उपग्रहांचे संचालित करते. ती कंपनी भारतात येत असून महाराष्ट्रासोबत भागीदारी करत असून, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,”
स्टारलिंक भारतात ९ ठिकाणी बेस स्टेशन (इंटरनेटचे केंद्र) बनवत आहे. ते जिओ आणि वनवेबशी स्पर्धा करेल. त्यांच्या ६,००० हून अधिक उपग्रहांमुळे, ते भारतातील दूर-दूरच्या भागांमध्ये चांगले आणि जलद इंटरनेट देऊ शकतील.