Loose Masala Sales Ban pudhari photo
मुंबई

Loose Masala Sales Ban : सुटा मसाला विक्रीवर निर्बंध!

चिवडा, चकल्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच एफडीएचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : यंदाच्या दिवाळीसाठी चिवडा, चकल्या करायला घेण्यापूर्वीच महाराष्ट्रात सुट्ट्या मसाला विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक निर्बंध आणले आहेत.

या सुट्ट्या मसाल्यांत भेसळ आढळल्यास संबंधित उत्पादकाचा परवाना रद्द करून त्याच्यावर खटलाही दाखल केला जाणार आहे. हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, गरम मसाला, करी पावडर यांसह सर्व प्रकारच्या मसाल्यांना हे आदेश लागू असतील.

मसाल्यांचे पॅकिंग आणि सीलिंग उत्पादनस्थळी योग्य पद्धतीने करणे आवश्यक राहील. या आदेशानुसार, मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांची सुट्या व विनापॅकिंग विक्री करण्यास बंदी असेल.

  • मसाल्यांमध्ये मेटॅनिल यलो, रोडामाईन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर केला जातो. आता त्यास मनाई करण्यात आली आहे.

  • सुट्ट्या मसाल्यांचे वजन वाढविण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळले जातात. ही भेसळ आढळल्यास कारवाई होईल.

  • अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्रीही बंद करण्यात आली आहे.

  1. मसाले शुद्ध, नैसर्गिक, सेंद्रिय किंवा आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे दावे केल्यास तसे पुरावे तयार ठेवावे लागतील.

  2. उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, कॅटरर्स आणि ई-कॉमर्स व्यवसायांचाही यात समावेश आहे.

  3. मसाले सार्वजनिक रस्ते, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ वाळविण्यास मनाई करण्यात आली आहे.

  4. निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापरही करता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT