Devendra Fadnavis file photo
मुंबई

Shetkari Karj Mafi: शेतकऱ्यांनो कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहावी लागणार! निवडणूक आयोगाची मोठी अट; मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागणा आहे. निवडणूक आयोगाने एक अट घातली आहे. त्यामुळे आज कर्जमाफीची घोषणा होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मोहन कारंडे

Devendra Fadnavis on Shetkari Karj Mafi

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने एक अट घातली आहे की, तुम्ही कर्जमाफीची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून घ्या, पण घोषणा करता येणार नाही. यामुळे कर्जमाफीची घोषणा करता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा बाकी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पुरुषांनी लाटलेले ‌‘लाडकीं‌’चे पैसे वसूल करू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाडकी बहीण योजनेतून कोणालाही वगळलेले नाही. ज्यांनी ई-केवायसी केलाच नाही त्यांचे पैसे थांबविले आहेत. 14 हजार पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतले. शिवाय, 5 लाख सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे 10 लाख, गाडी असणारे 5 लाख असे निकषात न बसणाऱ्यांनीही योजनेतून पैसे घेतले. ज्या अपात्र महिला आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, ज्या पुरुषांनी निधी घेतला त्यांच्याकडून तो वसूल करूच, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चांवर स्पष्ट खुलासा केला. याशिवाय, महिला सुरक्षा, नाशिक येथील लव्ह जिहाद, मराठा आरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेतून कोणालाही वगळले नाही. योजना सुरू केली तेव्हाच उत्पन्न, वय असे निकष होते. स्वयंघोषणेच्या आधारे योजना लागू केली. शेवटी हा पैसा जनतेचा आहे, त्यामुळे सीएजीचे ऑडिट होते. दोनवेळा केवायसीची मुदत दिली, त्यात सर्वांना पात्र केले. 25 लाख केवायसी चुकले होते, त्यातही सुधारणा करत आम्ही निधी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT