Maharashtra economic intelligence unit file photo
मुंबई

Maharashtra News | आता महाराष्ट्राचाही आर्थिक गुप्तचर विभाग

राज्य सरकार आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणार असून गुन्हेगारी आर्थिक साखळी उद्ध्वस्त करण्यास मदत होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra economic intelligence unit

मुंबई : केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकारही आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणार आहे. बँक घोटाळ्यांचा पर्दाफाश, गुन्हेगारी नेटवर्क आणि आर्थिक फसवणूक रोखण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने हे युनिट तयार केले आहे.

राज्यासह देशात सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. यावर निर्बंध आणण्यासह ऑनलाईन फसवणुकीला चाप लावण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ दरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री कदम यांनी आर्थिक गुप्तचर युनिट स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत आर्थिक गुप्तचर युनिटचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याकडे सोपवले जाणार आहे. २ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ८ पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य त्यांना दिले जाईल. तसेच इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट नागरिकांच्या रोजच्या जीवनात दिसून न येणारी, परंतु अत्यंत महत्त्वाची आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यातही युनिट काम करणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी आर्थिक साखळी उद्ध्वस्त करण्यास मदत होईल.

युनिट असे काम करणार

  • आर्थिक गुन्ह्यांची माहिती संकलन व विश्लेषण करणे.

  • बैंक घोटाळ्यांवर नजर ठेवणार.

  • गुप्तचर यंत्रणांच्या सहाय्याने आर्थिक गुन्हेगारी नेटवर्क शोधून काढण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT