मुंबई : राज्यभरातील धरणांतील एकूण पाणीसाठा ६४.१७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही तब्बल सुमारे २६.३७ टक्क्यांची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांत सर्वात कमी ३६.७५ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील एकूण ३०४२ धरणांत गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ९०.५४ टक्के साठा होता.
जलसंपदा विभागाच्या १५ नोव्हेंबरच्या अहवालानुसार, राज्यातील सर्व धरणांची उपयुक्त साठवण क्षमता ४१ ,००९.६६ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी सध्या २६ हजार ३१६.२१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे; तर एकूण पाणीसाठा ३३ हजार ८२८.७३ दशलक्ष घनमीटरपर्यंत मर्यादित झाला आहे. राज्यातील १३८ मोठ्या धरणांत ७१.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून २६६ मध्यम धरणांतील पाणीसाठ्याचे प्रमाण ५७.२७ टक्के आहे तर २,६३८ लघु धरण प्रकल्पांत ३७.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
विभागनिहाय पाणीसाठा
छत्रपती संभाजीनगर ३६.७५%
अमरावती ५२.२७%
नागपूर ५६.०२%
नाशिक ७४.०५%
पुणे ७४.८२%
कोकण ८१.६९%
कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती (कंसात गतवर्षीची आकडेवारी)
राधानगरी : ६.६८ टीएमसी - ८६.०२ %, (७.६२ टीएमसी ९८.९४ %)
तुळशी : २.९३ टीएमसी - ९०.२५ %, (३.१७, टीएमसी ९७.५२ %)
वारणा :२४.४५ टीएमसी - ८८.८६ %, (२७.२३ टीएमसी ९८.९६ %)
दूधगंगा : २०.९९ टीएमसी - ८७.५१ %, (२०.०३ टीएमसी ८३.५१%)
कासारी : २.७३ टीएमसी - ९९.३३ %, (२.७५ टीएमसी १०० %)
कडवी : २.४० टीएमसी - ९६.४९ %, (२.४८ टीएमसी ९९.४८%)
कुंभी : २.६३ टीएमसी - ९७.५० %, (२.६९ टीएमसी ९९८.५३ %)
पाटगाव : ३.५७ टीएमसी - ९६.४७ %, (३.७० टीएमसी १०० %)