मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच सहकार पॅनलचे प्रवीण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे तिघे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही विजयी घोडदौड सुरू करतानाच सहकार पॅनलने आपले उमेदवार जाहीर केले.
राज्य सहकारी संघ सध्या अडचणीत आहे. त्यास ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सहकार पॅनलने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. 90 टक्के मतदार कुसाळकर-दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नादवले गेले असल्याने सहकार पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे. सर्व मतदारांनी, उमेदवारांनी सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन कुसाळकर व दरेकर यांनी केले आहे.
मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत कुसाळकर-दरेकर पॅनल एकमेकांविरुद्ध लढले होते. मात्र या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुसाळकर आणि प्रवीण दरेकर यांना एकत्र येऊन लढण्याचा सल्ला दिला. राज्य सहकारी संघ ही सहकार क्षेत्राला शिक्षण, प्रशिक्षण देणारी संस्था असल्याने फार स्पर्धा किंवा संघर्ष न करता सहकार संघात समन्वयाने काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी कुसाळकर-दरेकर द्वयींना केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा कुसाळकर यांनीही मान राखला आणि सहकार संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनल एकजुटीने उतरले.
1. प्रकाश यशवंत दरेकर : राज्यस्तरीय संघ प्रतिनिधी
2. हिरामण सातकर : पुणे विभाग
3. धनंजय सर्जेराव कदम (शेडगे) : कोल्हापूर विभाग
4. प्रवीण दरेकर : मुंबई विभाग
5. अरुण पानसरे : कोकण विभाग
6. गुलाबराव मगर : औरंगाबाद विभाग
7. वसंत पाटील : लातूर विभाग
8. प्रकाश भिशीकर : नागपूर विभाग
9. अशोक जगताप : विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी
10. रिक्त - नाशिक विभाग
11. रिक्त - अमरावती विभाग
12. संजीव कुसाळकर
13. रामदास मोरे
14. नितीन बनकर
15. सुनील जाधव पाटील
16. नंदकुमार काटकर
17. विष्णू घुमरे - अनुसूचित जातीजमाती
18. अनिल गजरे - भटक्या विमुक्त जमाती
19. अर्जुनराव बोरुडे - इतर मागासवर्ग
20. जयश्री पांचाळ - महिला प्रतिनिधी
21. दीपश्री नलावडे - महिला प्रतिनिधी