पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई ट्रॅफिक पोलिसांना पाकिस्तानी क्रमांकावरून एक व्हॉट्सअप संदेश प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये स्वतःला मलिक शहबाज हुमायून रजा म्हणून ओळखणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.