एबी फॉर्म म्हणजे काय? नेमका काय असतो हा एबी फॉर्म ? प्रत्येक राजकीय कार्यकर्ता या एबी फॉर्मसाठी का जोर लावतो ? राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी का महत्त्वाचा आहे एबी फॉर्म ? याचा हा लेखाजोखा... (Maharashtra Assembly Polls)
राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पार रंगून गेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे फॉर्म ए आणि फॉर्म बी. निवडणूक प्रक्रियेत याच एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळेच संबंधित उमेदवार हा एबी फॉर्म देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हही दिले जाते. (Maharashtra Assembly Polls)
हा मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य राजकीय पक्ष किंवा नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे सांगणारा संवाद आहे. हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून येतो; ज्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का असणे आवश्यक असते.
हा राजकीय पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याकडून (ज्यांच्या नावाचा उल्लेख पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने जारी केलेल्या फॉर्म ए मध्ये केला आहे.) मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरला केला जातो. हे पत्र रिटर्निंग ऑफिसरला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती देते, ज्याला पक्षाचे चिन्ह दिले जावे.
अधिकाऱ्यांच्या मते, नामनिर्देशनपत्र नाकारले जाण्याच्या वारंवार उपस्थित होणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे एबी फॉर्म आणि इतर कागदपत्रे जमा करण्यात झालेला उशीर. फॉर्म नाकारण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे, प्रतिज्ञापत्रातील काही भाग न भरलेला ठेवणे. राष्ट्रीय पक्षांचे फॉर्म ए आणि फॉर्म बी बहुतेक वेळा निर्दोष असतात आणि ते अंतिम मुदतीनंतर जमा केले तर नाकारले जातात. (Maharashtra Assembly Polls)