Maharashtra Investment : सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीतही गर्जा महाराष्ट्र!  File Photo
मुंबई

Maharashtra Investment : सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीतही गर्जा महाराष्ट्र!

देशातील ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम ठेवले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाले असून महाराष्ट्र देशात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. देशातील ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी समाजमाध्यमांतून परकीय गुंतवणुकीबाबतची माहिती दिली. महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण २५ हजार ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जनतेचे आभार

या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्व-ाखाली राण्याची प्रगती अशीच सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान ऑगस्टमध्ये उड्डाण घेईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतानाच या विमानतळावरून रोज १८ उड्डाणे करण्याची घोषणा इंडिगो एअरलाईन्सने केली आहे. नवी मुंबईतून उड्डाणे जाहीर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.

१० वर्षांतील महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक

६१,४८२ कोटी

१,३१,९८० कोटी

८६,२४४ कोटी

५७,१३९ कोटी

२५,३१६ कोटी

१,१९,७३४ कोटी

१,१४,९६४ कोटी

१,१८,४२२ कोटी

१,२५,१०१ कोटी

१,६४,८७५ कोटी

कोणत्या राज्याचा कितवा नंबर ?

महाराष्ट्र

१,६४,८७५

कर्नाटक

५६,०३०

दिल्ली

५१,५४०

गुजरात

४७,९४७

तामिळनाडू

३१,१०३

हरियाणा

२६,६००

आकडे कोटीतhttps://www.youtube.com/watch?v=I1piAoh7pg8

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT