Aditi Tatkare Pudhari
मुंबई

Smart Anganwadi Facilities: राज्यातील ३ हजार ८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; अदिती तटकरे यांची माहिती

ई-लर्निंग सुविधा, वॉटर प्युरिफायर, स्वच्छता किट आणि आधुनिक स्वयंपाकघराचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अंगणवाडी केंद्रातील सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची भर घालत राज्यातील ३ हजार ८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

या योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे. बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण, आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात.

आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT