Maha Icon 2026‌ Pudhari
मुंबई

Pudhari Maha Icons 2026‌: ‘पुढारी‌’ समूहाचा ‌‘महा आयकॉन 2026‌’ सन्मान सोहळा उद्या

Pudhari Mahaicons 2026 Awards: पद्मविभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांच्यासह उद्योग, प्रशासन क्षेत्रांतील दिग्गजांचा होणार सन्मान

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Maha Icons 2026‌ Date Time Venue

मुंबई: महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहाने ‌‘महा आयकॉन 2026‌’ या नव्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत ‌‘कर्तृत्वाचा अभिमान, महाराष्ट्राची शान‌’ हे बीदवाक्य असलेल्या पहिल्या सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 4) परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. दुपारी 4.30 वाजता दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

या भव्य सोहळ्याला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या चार पद्मविभूषण आणि पद्मश्री सन्मानांनी गौरवान्वित व्यक्तींना ‌‘जीवनगौरव‌’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

याशिवाय ‌‘पुढारी‌’च्या निवड समितीने निवडलेल्या निवडक व्यक्ती व उद्योग समूहांना या सोहळ्यात पुरस्कृत केले जाणार आहे. लीगसी, इनोव्हेशन, पब्लिक सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल इम्पॅक्ट या पाच श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT