मुंबई

लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री फडणवीस

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाेकसभा निवडणुकीत आम्‍ही महाराष्ट्रात  कमी पडलो. याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो.  काेठे कमी पडलाे याचे विश्‍लेषण केले जाईल,  असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बाेलताना स्‍पष्‍ट केले.

आम्ही फक्त अर्धा टक्‍क्‍याने मागे राहिलाे

या वेळी फडणवीस म्‍हणाले की, लाेकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा एकट्या भाजपने जास्त मिळवल्या आहेत. भाजप आणि इतर पक्ष मिळून सरकार तयार होत आहे. लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 43 टक्के मते मिळाली. तर, आम्ही फक्त अर्धा टक्‍क्‍याने मागे राहिलो. यामध्ये महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. मुंबईमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या.

2019 आणि 2024 च्या निवडणूकीतील मतांचे वर्गीकरण करताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला 27.84 टक्के मते मिळाली होती. तर, यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपला 26.17 टक्के इतकी मते मिळाली. तर, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला 16.41 17 टक्के मिळाली होती. यामध्ये त्यांच्या 13 जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चुरशीने निवडणूका झाल्या यामध्ये आमच्या 8 जागा 4 टक्के मताने पडल्या.

सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आम्हाला भोवली. निवडणूक दरम्यान मी कुठ तर कमी पडलो. म्हणूनचं मी निकालाची जबाबदारी मी स्वीकारतो, असेही फडणवीस म्‍हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT