मुंबई

Rainfall Forecast| पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागात हलका ते मध्यम पाऊस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात मान्सूनला सुरूवात झाली असून, बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला आहे. दरम्यान पुढील ५ दिवस राज्यातील कोकण विभागातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Rainfall Forecast) भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील अपडेट हवामान विभागाने आज (दि.१३ जून) सकाळी दिलेल्या बुलेटीनमध्ये दिली आहे.

Rainfall Forecast: 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये १३ जून ते १७ जून रोजी आसाम आणि मेघालयमध्ये १५ जून ते १७ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ईशान्य भारतातील अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यात १४ जून ते १६ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज (Rainfall Forecast) वर्तवण्यात आला आहे.

आणखी काही भाग मान्सून व्यापणार

नैऋत्य मान्सूनची वाटचाल पुढे चालू असून, पुढील ३ दिवसात उर्वरित महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग व्यापेल, असेही हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीनमध्ये (Rainfall Forecast) स्पष्ट केले आहे.

उत्तरेकडील राज्यांत उष्णतेची लाट कायम

मान्सून आगमनानंतरही उत्तर भारतातील बहुतांशी राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तरप्रदेश (१३ जून ते १७ जून), पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड (१३ जून आणि १४ जून) तर १५ जून रोजी या राज्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पुढील ५ दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली मध्ये देखील उष्णतेच्या लाटेची शक्याता आहे, असेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT