मालाडमध्ये जमीन खचून ५ मजूर अडकले, एकाचा मृत्‍यू  Pudhari Photo
मुंबई

मालाडमध्ये जमीन खचून ५ मजूर अडकले, एकाचा मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

शांताराम झील, खोत कुवा रोड, येथे इमारतीचे काम सुरु असताना जमीन खचून दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी जोरदार पावसामुळे जमीन खचून 5 मजूर अडकल्याची माहिती समोर येत आहे. दरम्‍यान यातील एका मजुराचा मृत्‍यू झाला आहे.

सकाळी साधारणपणे 10.30 वाजण्याच्या दरम्यान वोरा स्काईलाईन या इमारतीच्या कामासाठी खोदकाम केले होते. पावसाच्या पाण्याने सदर ठिकाणी भूस्खलन झाल्याने पाच मजूर यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर मजुरांचा शोध सुरु आहे. या दरम्‍यान एका मजूराचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT