Lalbaugcha Raja Visarjan 2025
मुंबई : लालबागचा राजाच्या विसर्जनामध्ये व्यत्यय आला आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती घेऊन आलेली ट्रॉली वाळूत अडकली. त्यातच समुद्राला भरती असल्यामुळे लाटांचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे ट्रॉली पुढे ढकलण्यास अडचण येत आहे.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओहोटीची वाट पहावी लागणार आहे. असंख्य भक्तांचा जनसमुदाय गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची वाट पाहत उभा आहे. नवीन बनवलेल्या तराफ्यावर लालबागच्या राजाला विराजमान करून विसर्जन करण्याचा मंडळाचा विचार आहे. पण सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाची शेवटची आरती अजून शिल्लक राहिली आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांच्या चपलांचा अक्षरश ढीग पडला आहे.
लालबाग राजासाठी तयार करण्यात आलेला अत्याधुनिक स्वयंचलित तराफा हा मागील तराफ्याच्या तुलनेत दुप्पट मोठा आहे. हा तराफा पाण्यात ३६०डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो. मागील वर्षीच्या तराफ्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने सुमद्रात ओढून न्ह्यावं लागत होतं. हा अत्याधुनिक तराफा स्वयंचलित आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी हे देखील लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मिरवणुकीत सहभागी झाले.