Lalbaugcha Raja Darshan Video Pudhari
मुंबई

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची फरफट; 16 तास रांगेत थांबूनही केली जातेय धक्काबुक्की, पाहा व्हिडिओ

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल 15 ते 16 तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

Lalbaugcha Raja Darshan: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. यंदाही बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून, भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तब्बल 15 ते 16 तास रांगेत उभे राहिल्यानंतरही सामान्य भाविकांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागत आहे.

दर्शनासाठी रात्रीपासून रांगेत उभे असलेल्या भाविकांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक भाविकांनी 15 ते 16 तास प्रतीक्षा करूनही शांतपणे दर्शन घेता येत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये सामान्य भाविकांना 15 सेकंद तरी व्यवस्थित दर्शन घेता येईल का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच व्हीआयपी दर्शन आणि सामान्य दर्शन यामध्ये फरक का असावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

'श्रद्धा आहे, पण...'

पोस्टमध्ये कोणालाही टार्गेट करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाविक तासन्‌तास रांगेत उभे राहत असतील, तर त्यांना किमान काही सेकंद शांतपणे दर्शन घेण्याची संधी मिळायला हवी, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

भाविकांची श्रद्धा मोठी आहे, पण त्या श्रद्धेच्या बदल्यात त्यांना त्रास, ढकलाढकली किंवा असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये, अशी मागणी आता सोशल मीडियावर केली जात आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांसाठी गर्दीचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT