Ladki Bahin Yojana installment started latest news
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज (दि.११) महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू असल्याचे देखील एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
मंत्री तटकरे यांनी आज (दि.११) एक्स पोस्टवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी १ हजार ५०० रुपये (1500 RS) वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. मागील विधानसभा निवडणुकांत महायुती सरकारसाठी हीच योजना किंगमेकर ठरली आणि महायुती पुन्हा सत्तेत आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयामुसाक लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 14 हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.