Kurla Illegal Hawkers Bulldozer Action: कुर्ल्यातील फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर आता महापालिका अॅक्शन मोडवर आली असून त्यांनी ज्या परिसरात मारहाण झाली होती त्या भागात उत्तर प्रदेशच्या धरतीवर बुलडोझरने कारवाई सुरू केली आहे. सकाळपासून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
कुर्ला परिसरात फेरीवाल्यांकडून स्थानिक नागरिकांना, भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता. आता त्यानंतर पालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत पालिकाने अतिक्रमण निर्मूलन, बेकायदेशीर बांधकामे हटवणे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे असं सांगितले आहे.