कुर्ल्यात फेरीवाल्यांची तरुणाला बेदम मारहाण pudhari photo
मुंबई

Kurla assault case : कुर्ल्यात फेरीवाल्यांची तरुणाला बेदम मारहाण

स्थानिकांनी भाभा रुग्णालयात उपचासाराठी दाखल केले

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : कुर्ला येथे पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी घडला . अक्षय पवनकुमार गुप्ता(27) असे त्याचे नावे आहे. अनधिकृतपणे रस्ता अडवून बसलेल्या फेरीवाल्यांचा व्हिडिओ बनवून तक्रार केल्याने त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

जानेवारी महिन्यात कुर्ला येथील न्यू मिल रोड येथे आकाश सिंग, आदित्य पानसे, असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांनी मिळून प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर संतप्त सकल हिंदू समाजाने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर सुमारे दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केले होते.

मंगळवारी अक्षय हा त्याच्या नातेवाईकांना कुर्ला रेल्वे स्थानक येथे दुचाकीवरून सोडायला आला होता. यावेळी फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ काबीज केल्याने त्याने पालिका अधिकारी आणि पोलिसांना याची तक्रार दिली. पालिका अधिकारी तिथे कारवाई करू लागताच त्याचा व्हिडिओ अक्षय मोबाईलमध्ये बनवू लागला.

यावेळी फेरीवाल्यांचा मोठा जमाव त्याच्या दिशेने आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. त्याला धक्का मारत त्यांनी तिथून थोडे दूर नेले आणि तिथे त्याला 25 ते 30 जणांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यावर मारहाण केल्याने तो खाली कोसळला. स्थानिकांनी त्याला भाभा रुग्णालयात उपचासाराठी दाखल केले.

या प्रकरणी कुर्ला पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आकाश गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT