छगन भुजबळांविरुद्ध कुणाल दराडे मैदानात? file photo
मुंबई

Maharashtra politics | छगन भुजबळांविरुद्ध कुणाल दराडे मैदानात?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे (Kunal Darade) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कुणाल यांनी बुधवारी मुंबईत भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे. शरद पवारांचे विश्वासू साथीदार असलेले भुजबळ अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे भुजबळांच्या पराभवासाठी स्वतः शरद पवार रणनीती आखत आहेत. यानुसार जयंत पाटील यांनी कुणाल यांना बुधवारी मुंबईत बोलावून त्यांच्याशी निवडणूक लढण्याविषयी चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे, शिंदे सेनेचे आमदार किशोर दराडे हे या भेटीवेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT