मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस, कुळगाव बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरता सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवारी १४ जुलैला दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सोडतीसाठी १३ ऑगस्टला रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. १४ ऑगस्टला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरवले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदवता येणार आहेत.
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. ३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे. सोडतीचा निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे तसेच अॅपवर प्राप्त होणार आहे.
२० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत - ५६५ सदनिका
१५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये १६७७ म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) - ४१
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत भुखंड -७७