Khar Police Rescue Man Pudhari
मुंबई

Khar Police Rescue: पोलिस जवळ पोहोचताच त्याने समुद्रात उडी मारली अन्...; खारमध्ये थरारक बचावकार्य, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला

Khar Police Sea Rescue: खार परिसरात समुद्रात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाचे पोलिसांनी प्राण वाचवले.

Rahul Shelke

Khar Police Sea Rescue: मुंबईतील खार परिसरात समुद्रात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाचे पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्राण वाचवले. पोलिसांनी त्याला समुद्रातून सुखरूप बाहेर काढले असून, या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खार पोलिसांना वायरलेसवरून एक इसम समुद्रात खोलवर असलेल्या खडकावर उभा असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हवालदार विकास बाबर यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वारंवार बाहेर येण्यास सांगितले; मात्र तो बाहेर येण्यास तयार नव्हता.

पोलिसांचे पथक त्याच्याजवळ पोहोचताच त्याने अचानक समुद्रात उडी मारली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

वाचवण्यात आलेला तरुण ३१ वर्षांचा असून तो झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा जीव वाचवल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली आहे. ही घटना घडत असताना पोलिसांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला.

या घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली. व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनीही समुद्रात उडी घेऊन त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे खार पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT