मुंबई, पुढारी वृत्तसेवा: केसरी टूर्सचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे आज (दि. १५) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मूळचे पालघर तालुक्यातील मथाणे येथील होत. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी खुप कष्टाने केसरीला जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास आणले.