Kartiki Ekadashi vari 
मुंबई

Kartiki Ekadashi vari: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कार्तिकी एकादशीनिमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा; १ हजार १५० जादा एसटी बस

Pandharpur Yatra MSRTC ST Buses news: लाखो भाविकांच्या सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची एसटी महामंडळाकडून व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावर्षीच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूर येथे ११५० जादा एसटी बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, या काळात पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान जादा गाड्या

कार्तिकी एकादशीनिमित्त २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जादा बस फेऱ्या 'चंद्रभागा' यात्रा बसस्थानकावरून चालवल्या जातील. चंद्रभागा बसस्थानकावर १६ फलाट असून, सुमारे १००० बसेसच्या पार्किंगची आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुख्य यात्रेच्या दिवशी बसस्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी १२० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मार्गावर बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्त करण्यासाठी पंढरपूर शहराबाहेर फिरती बिघाड दुरुस्ती पथके (Maintenance Units) तैनात करण्यात येणार आहेत. गर्भवती माता आणि स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर 'हिरकणी कक्ष' ('Hirakani Room') उभारण्यात आला आहे.

गाव ते पंढरपूर थेट बस सेवा

राज्यातील कोणत्याही गावातून ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास, त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात आरक्षणासाठी संपर्क साधावा.

ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती कायम

एसटी महामंडळाच्या नियमानुसार, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक योजना) चालू राहील. महिलांसाठी देखील तिकीट दरात ५० टक्के सवलत (महिला सन्मान योजना) लागू असेल.

मागच्या वर्षी ६ कोटी उत्पन्न

मागील कार्तिकी यात्रेत एसटी महामंडळाने १०५५ जादा बसेसद्वारे सुमारे ३ लाख ७२ हजार भाविकांची वाहतूक करून ६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. यंदाही लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर व्हावा यासाठी हजारो कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत राहतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT