Kandivali Drowning Incident Pudhari
मुंबई

Kandivali Drowning Incident: कांदिवलीत दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाचा शोध सुरू

यातील प्रीत याचा मृतदेह सापडला आहे. तर विश्वकर्मा याचा शोध सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली: कांदिवलीत मित्रांसमवेत पोहण्‍यासाठी गेलेले दोन तरुण दोन वेगवेगळ्‍या ठिकाणी बुडाले असून यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. तर एकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

येथील महात्मा गांधी छेद मार्ग ४ येथील सागवाडी विहिरीत प्रीत गणवे (१६) हा तर चारकोप गाव येथील डिंगेश्वर तलावात सोनू विश्वकर्मा (२२) हा तरुण बुडाला. यातील प्रीत याचा मृतदेह सापडला आहे. तर विश्वकर्मा याचा शोध सुरू आहे.

कांदिवली पश्चिमेला साईनगर मधील हेरिटेज इमारत ३ आय विंग रूम नं ९०२ मध्ये राहणारा प्रीत संदीप गणवे (१६) हा तरुण आपल्या चार मित्रांसह सागवाडी येथील विहिरीत पोहण्यास गेला होता. बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्‍याने विहिरीत उडी घेतली मात्र तो बाहेर आलाच नाही. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळविले.

अग्निशमन जवान घटनास्‍थळी दाखल झाले. स्टेशन अधिकारी प्रवीण सोरटे, जवान सुरज आढाव आणि विशाल बागायतकर यांनी तातडीने विहिरीतील गाळात अडकलेल्या प्रीतला बाहेर काढले. बाजूच्या निधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषित केले. संदीप गणवे यांचा प्रीत हा एकुलता होता. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

तर दुसरी घटना चारकोप गाव येथील श्री विसर्जन डिंगेश्वर तलावात घडली. सोनू विश्वकर्मा (२२) हा तरुण मित्रांबरोबर दुपारी १२.३० च्या सुमारास पोहण्‍यासाठी गेला होता. मात्र पोहताना तो बुडला.

मित्रांनी याबाबत कळवल्‍यानंतर घटनास्थळी अन्गिशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. त्‍याचा सहा तास शोध घेतला . मात्र तो सपाडला नाही. त्‍यामुळे नौदल व एनडीआरएफचे पथक बोलावण्‍यात आले. या पथकाकडून अद्याप शोधमोहीम सुरू होता.

बुडालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT