मालाड : जुहू बीच वर दिनांक २८ ला रात्री १० वाजताच्या सुमारास एक महिलेला पर्यंटकाच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मालवणीतील रहिवासी बदरुद्दीन शेख हे जुहू बीच वर आपल्या परिवारासह फेरफटका मारण्यासाठी गेले होते तिथे त्यांना एक महिला बुडताना दिसल्या. त्यांनी तिथे हजर पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले व ते आणि पोलीस कर्मचारी त्या महिलेला वाचव्यासाठी समुद्रात गेले.
पण त्यांच्या लक्षात आले की ती खूप लांब असल्याने त्यांनी किनाऱ्यावरील लाईफ जॅकेट घातले व लाईफ बॉय (रिंग )घेऊन त्या महिलेला वाचवण्यासाठी पुन्हा आत खोल समुद्रात जाऊन तिला वाचवण्याचे प्रयत्न करू लागले. त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की ही महिला आत्महत्तेचा प्रयत्न करीत आहे. जसं - तस त्यांनी या महिलेला किनाऱ्यावर आनण्याचा प्रयत्न केला. महिलेचे वय अंदाजे ४०/४५वर्ष असेल. या दरम्यान किनाऱ्यावरील जीव रक्षक ही त्यांच्या मदतीला आले व सर्वांनी मिळून महिलेला बाहेर काढले व तिथे इतर पोलीसही पोहचले होते त्यांनी तिला ताब्यात घेतले व पुढील चौकशी करत होते. अशी माहिती बदरुद्दीन यांनी दिली.