पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी "कारण पुतण्या गद्दार निघाला" अशी बोचरी टीका करत अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. (Ajit Pawar vs Jitendra Awhad)
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "कारण पुतण्या गद्दार निघाला, वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची, काका का असे करता माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस २०१९ सारखी माफी नाही .गद्दारांना माफी नाही !"
अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला शायरी शेअर करत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे, "बेशक उंगली उठा मेरे किरदार पर l शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये ll" असं लिहित तथाकथित पुरोगामी हा हॅशटॅग दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीचा आज (दि.१५) निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी साडेचार वाजता निकालपत्राचे वाचन करणार आहेत. निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार गटाला मूळ पक्ष ठरवत चिन्ह बहाल केले. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे लक्ष असणार आहे.