पुढारी ऑनलाईन डेस्क : बापाला आणि मुलीला सोडा आणि आमच्याकडे या, अशी ऑफर अजित पवार आमच्या खासदारांना देत आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एकीकडे शरद पवार यांना आमचे दैवत म्हणता आणि दुसरीकडे अशी ऑफर देता, काय तुमचे संस्कार, असे म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांना लक्ष केले. बुधवारी माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी आव्हाड म्हणाले की, भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत. सर्व सामान्य लोकांच्या मनात त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. वाल्मिक कराड याने प्लॅनिंग करून खून केले, असे ते म्हणाले.