High Court Pudhari
मुंबई

Janhvi Kukreja Murder Case: जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत; सहआरोपीच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आईची याचिका; सीसीटीव्ही व फॉरेन्सिक पुराव्यांचा दाखला

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: खार येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजा हिच्या हत्ये प्रकरणातील सहआरोपी व तिची मैत्रीण दिया पडळकर हिची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. जान्हवीच्या आईने दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपूर्वी खार येथील भगवती हाइट्स या इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जान्हवी हिला तिचा प्रियकर श्री जोगधनकर याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत जान्हवीचा मृत्यू झाला. जान्हवीची मैत्रीण दिया हिने श्री याला साथ दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी सत्र न्यायालयाने जोगधनकरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी दिया हिला निर्दोष मुक्तता केली.

सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता पुरावे असतानाही दिया हिला निर्दोष मुक्त केल्याचा दावा जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी याचिकेत केला आहे.

तसेच न्यायालयाने आरोपीची घटनास्थळी उपस्थिती मान्य करूनही गुन्ह्यातील तिच्या सहभागाकडे दुर्लक्ष केले. पुरावे असतानाही न्यायालयाने दियाची निर्दोष सुटका केली. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळी मिळालेल्या पडळकरच्या वस्तूंचा उल्लेख करण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, दिया ज्या पलंगावर झोपली होती, तेथील उशा आणि चादरीवर जान्हवीचे रक्त आढळले होते असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT