जैन मंदिर पाडल्याप्रकरणी जैन समुदायांनी विलेपार्ले ते अंधेरी भव्य मोर्चा काढला. Pudhari Photo
मुंबई

जैन मंदिर पाडल्याप्रकरणी जैन समुदायांचा विले पार्ले ते अंधेरी भव्य मोर्चा

Mumbai Jain community March | महापालिकेच्या कारवाईचा केला निषेध

पुढारी वृत्तसेवा

जोगेश्वरी : पुढारी वृत्तसेवा : विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित झाले आहेत. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज (दि.१९) विलेपार्ले पूर्व ते महापालिकेच्या अंधेरी के. पूर्व विभाग कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील संपूर्ण जैन आणि हिंदू समाज हिंदू विश्व परिषदेचे सदस्य, जैन समाजाचे सर्व विश्वस्त, मंडळे, संस्था सहभागी झाल्या होत्या. (Mumbai Jain community March)

दरम्यान, मंदिर पाडण्याच्या संदर्भात महापालिकेने नोटीस दिली होती. या विरोधात येथील जैन बांधवांनी शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ८ एप्रिल रोजी याचिका फेटाळून लावली होती. मात्र मंदिर पाडण्यास परवानगी देण्यास तोंडी स्थगिती दिल्याचे जैन धर्मियांचे म्हणणे आहे. असे असताना महापालिकेने बुधवारी केलेल्या कारवाईमुळे संताप व्यक्त होत आहे. विरोध असतानाही महानगरपालिका 'के' पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांनी कोणताही विचार न करता आदेश काढल्याचा आरोपही जैन धर्मियांनी केला आहे. जैन धर्मियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाईची करावी, जैन मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे, अशी मागणी जैन धर्मियांकडून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT