१ हजार भाविकांची राहण्याची सोय, पुण्याहून सुटणार २ भारत गौरव ट्रेन file photo
मुंबई

महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये आयआरसीटीसी उभारणार टेंट सिटी

Prayag Kumbh Mela 2025 |१ हजार भाविकांची राहण्याची सोय, पुण्याहून सुटणार २ भारत गौरव ट्रेन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा जानेवारी महिन्यात प्रयागराजला होणार आहे. या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक, पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) घेतला आहे. त्यासाठी महाकुंभ ग्राम नावाचे एक लक्झरी टेंट सिटी उभारण्यात येत आहे. या टेंट सिटीमध्ये ४०० टेंट असून एक हजार भाविकांची राहण्याची सोय होऊ शकते. याशिवाय आयआरसीटीसी पुण्याहून दोन भारत गौरव ट्रेन चालविणार आहे.

भारतीय रेल्वे १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान कुंभमेळ्यासाठी देशभरातून ९९२ विशेष गाड्या चालविणार आहे. त्याशिवाय आयआरसीटीसीतर्फे देशभरात १३ भारत गौरव ट्रेन चालविणार आहे. यापैकी चार गौरव ट्रेन आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागातर्फे चालविण्यात येणार असल्याची माहिती आरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक गौरव झा यांनी बुधवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कुंभमेळ्यासाठी आयआरसीटीसीतर्फे पुण्याहून १५ जानेवारी आणि ५ फेब्रुवारी रोजी भारत गौरव ट्रेन चालविण्यात येणार आहे. या गाड्यांनी प्रवासी ७ रात्र-८ दिवसांच्या सहलीचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय विमान आणि रेल टुर पॅकेजची देखील सोय उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय राजकोट आणि इन्दौर येथून प्रत्येकी एक-एक भारत गौरव ट्रेन चालविण्यात येणार आहे. भाविकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन टेंट आरक्षित करता येणार असून लक्झरी तंबूसह विविध निवास पर्याय याबाबतची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT