Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ची स्थापना; ३ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी 
मुंबई

Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ची स्थापना; ३ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राला २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्था’ म्हणजेच ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अधिकाधिक जागतिक व देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना सर्व स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था काम करेल. या संस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि कामकाजासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या प्रशासकीय परिषदेच्या अध्यक्षपदी स्वतः मुख्यमंत्री असतील, तर सहअध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री काम पाहतील. राज्याचे उद्योगमंत्री या परिषदेचे उपाध्यक्ष असतील आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच, संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदीही मुख्यमंत्री आणि उपाध्यक्षपदी उद्योगमंत्री असतील. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ ही संस्था प्रामुख्याने गुंतवणूक आकर्षण, त्याचे सुलभीकरण आणि जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

थेट परदेशी गुंतवणुकीतील आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आणि २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठण्यासाठी राज्य सरकारने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या स्वतंत्र व स्वायत्त संस्थेची घडी बसवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT