प्रतीकात्मक छायाचित्र. file photo.
मुंबई

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोची उड्डाणे; फेब्रुवारी २०२७ पासून सेवेला सुरुवात

नियोजन अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: इंडिगोची आंतरराष्ट्रीय विमानसेवा फेब्रुवारी २०२७ पासून नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाणार असल्याचे इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांनी जाहीर केले आहे. यासाठीचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विस्ताराचा भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज होणारी १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे इंडिगो टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करेल.

यामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहरीन, रियाध, दम्माम, जेद्दाह, मदिना, कुवेत, रास अल खैमाह, फुजैराह, मस्कत, ढाका आणि जकार्ता या गंतव्यस्थानांसाठी सुरू असलेल्या सर्व विमानसेवांचा समावेश असेल.

काठमांडूसाठी दररोज एक अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे फेब्रुवारी ते जुलै २०२७ या कालावधीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे जाळे १२ गंतव्यस्थानांपर्यंत विस्तारेल.

या आंतरराष्ट्रीय विमानसेवांना आवश्यक असलेली देशांतर्गत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी इंडिगो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आवश्यक देशांतर्गत विमानसेवाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करेल.

५० लाख प्रवाशांचे होणार स्थलांतर

सुमारे ३० लाख प्रवाशांना स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावित योजनेमुळे पहिल्या टप्प्यात स्थलांतरासाठी निर्धारित केलेल्या प्रवासी वाहतुकीच्या सुमारे ६० टक्के प्रवाशांचे स्थलांतर होईल.

यामुळे मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या पुनर्विकासासाठी आवश्यक अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल. प्रारंभिक टप्प्यात सुमारे ५० लाख प्रवाशांना नवी मुंबई येथे स्थलांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. टर्मिनल १च्या पुनर्विकासामुळे त्याची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे ३३ टक्क्यांनी वाढून १.५ कोटींवरून २ कोटी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT