मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात प्रसिद्ध युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला महाराष्ट्र सायबरने १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा समन्स बजावले होते. याद्वारे त्याला सोमवार २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबरने २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रणवीर इलाहाबादियासह अपूर्वा मुखिजा, आशिष चंचलानी, तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना देखील समन्स बजावण्यात आले आहे. आतापर्यंत कलाकार, निर्माते अशा एकूण ४२ जणांना समन्स बजावण्यात आले आहे. मुख्य आरोपींमध्ये समय रैना, अपूर्व मुखिजा आणि रणवीर इलाहाबादिया यांचा समावेश आहे.