मुंबई : देशातील महत्त्वाच्या 7 शहरांमध्ये घर खरेदी व्यवहार जोमात असून विक्री झालेल्या घरांचे एकूण मूल्य यावर्षी 5.59 लाख कोटी रुपये इतके आहे. पुढील वर्षी यात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
दिल्ली, चेन्नई, महामुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, कोलकाता या 7 शहरांतील घर खरेदी व्यवहारांविषयीचा अहवाल ॲनारॉकने नुकताच प्रसिद्ध केला. यानुसार, 2026च्या पहिल्या सहामाहीत 1.93 लाख घरे विकली जातील. यांचे एकत्रित मूल्य 2.98 लाख कोटी इतके असेल. संपूर्ण 2025 वर्षांत 4 लाख 22 हजार 765 घरे विकली जातील. यांची एकत्रित किंमत 5.59 लाख कोटी इतकी असेल. या तुलनेत 2026च्या पहिल्या सहामाहीतील विक्री मूल्य 53 टक्के आहे.
विक्री मूल्याच्या वाढीत दिल्ली आणि चेन्नई सर्वात आघाडीवर आहेत. या शहरांमध्ये 2026च्या पहिल्या सहामाहीत संपूर्ण 2025 वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 74 टक्के व 71 टक्के वाढ दिसून येईल. यावर्षी पुण्यात 74 हजार 200 घरे विकली जातील. त्यांची एकत्रित किंमत 66 हजार 58 कोटी असेल. 2026च्या पहिल्या सहामाहीत 32 हजार 30 घरे विकली जातील. त्यांची एकत्रित किंमत 30 हजार 324 कोटी असेल.
महामुंबईत 2025 वर्षात 1.44 लाख घरे विक्री जातील. त्यांची एकत्रित किंमत 2 लाख 23 हजार 220 कोटी असेल. 2026च्या पहिल्या सहामाहीत 61 हजार 540 घरे विकली जातील. त्यांचे एकत्रित मूल्य 1 लाख कोटी असेल. महामुंबईत विक्री मूल्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 45 टक्के वाढ होईल.