विजेच्या धक्क्याने दुभत्या म्हैशींचा तडफडून मृत्यू Pudhari File photo
मुंबई

कल्याणामध्ये विजेच्या धक्क्याने दुभत्या म्हैशींचा तडफडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेकडील एका तबेल्यामध्ये शुक्रवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना समोर आली आहे. महावितरणच्या विद्युत वाहिनीशी संपर्क झाल्याने तबेल्यातील दुभत्या म्हशींचा तडफडून मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 जनावरांमध्ये 3 गाभण म्हशी, 2 रेडकू आणि एका वासराचाही समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

कल्याण पूर्वेकडील कल्याण-शिळ रोडला असलेल्या टाटा पॉवर परिसरात दुभत्या जनावरांचा हा तबेला आहे. दुपारच्या वेळी ही जनावरे रवंथ करत बसली होती. इतक्यात विद्युत प्रवाह वेगाने प्रवाहित झाल्याने तबेल्यात बांधलेल्या 3 गाभण म्हशी, 2 म्हशींचे रेडकू, 1 गाय आणि तिचे वासरू अशी 7 जनावरे तडफडून मृत्युमुखी पडली. ओलसर जमीन असल्यास या तारांतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाशी संपर्क झाल्यास धक्का बसण्याची शक्यता असते. बहुदा त्यामुळेच विद्युत प्रवाहाशी संपर्क झाल्याने जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा महावितरणचा कयास आहे.

दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तबेल्याचा मालक आणि त्याच्या मजुरांमध्ये शोककळा पसरली होती. या प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आहे. घडलेल्या घटनेचा वरिष्ठांना अहवाल दिला जाणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT