Engineering Student Death
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : माटुंगा येथील आयसीटीमध्ये इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना आज उघडकीस आली. सिद्धेश पाटील असे त्याचे नाव आहे. सिद्धेश याने मंगळवारी( २० ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास हॉस्टेलमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सिद्धेश पाटील हा मूळचा नाशिकचा रहिवासी होता. तो माटुंगा येथील 'आयसीटी' (ICT) संस्थेत शिक्षण घेत होता. येथे तो इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर नैराश्यासाठी उपचार सुरू होते.
जीवन संपविण्याचे विचार मनात येत असल्याचा मेसेज सिद्धेश पाटील याने डॉक्टरांना केला होता. डॉक्टरांनी तातडीने कुटुंबीयांना कळवले; कुटुंबीयांनी हॉस्टेलमधील मित्रांशी संपर्क साधला.
जीवन संपविण्याचे विचार मनात येत असल्याचा मेसेज सिद्धेश पाटील याने डॉक्टरांना केला होता. डॉक्टरांनी तातडीने कुटुंबीयांना कळवले. डॉक्टरांनी तात्काळ विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी इन्स्टिट्यूटमधील त्याच्या मित्रांशी संपर्क साधून त्याची विचारपूस करण्यास सांगितले. मात्र, त्याचे मित्र त्याच्या खोलीवर पोहोचले. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच सिद्धेशचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असणाऱ्या सिद्धेश पाटील याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे