मुंबई : तीन दिवसांपूर्वी सांताक्रुज येथे चौदा वर्षांची मुलगी अजगरीची हत्या आणि पत्नी नसीमा मोहम्मद सुलेमान कुजरा हिच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अखेर अटक केली.
मोहम्मद सुलेमान रज्जाक कुजरा असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. हत्येनंतर तो बिहारला पळून गेला होता. त्याला बिहारच्या गावाहून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री सांताक्रुज येथील कालिना, शिवनगर चाळीत घडली होती. मोहम्मद सुलेमान याला दारुचे व्यसन होते. दारूच्या नशेतच त्याने अजगरीची हत्या केली, तर नसीमा हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले.