मुंबई: मुंबई लोकलमध्ये सतत हिंसक प्रकार घडत असताना शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील यार्डात अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेसची स्वच्छता सुरू असताना एका डब्यात गुडघ्याखालचा रक्तबंबाळ मानवी पाय आढळून आला.
शुक्रवारी या गाडीची नियोजित साफसफाई सुरू असताना एम- २ डब्याच्या ट्रॉलीखाली अंडरगिअर तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला गुडघ्याखालून तुटलेला भाग अडकलेला दिसून आला.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा पाय सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातातून तुटलेला पाय अडकला की कुणाची हत्या करण्यात आली, असे प्रश्न या पायाने निर्माण केले आहेत. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे लोहमार्ग पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी सांगितले.