मुंबई : सुमारे अडीच कोटीच्या हेराईनसह एका महिलेसह दोघांना कांदिवली अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बोरिवली परिसरात काहीजण ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बोरिवलीतील पश्चिम दुतग्रती महामार्ग, नार्थ ब्रॉण्ड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 123 ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत 49 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. या हेरॉईनसह त्यांच्याकडून पोलिसांनी 8 लाख 87 हजारांची कॅश पोलिसांनी जप्त केली. तपासात ते दोघेही पनवेलच्या कळंबोलीचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले.
दुसऱ्या कारवाईत कांदिवली युनिटने पती-पत्नीला अटक केली. ते दोघेही राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशनजवळ हेरॉईनची विक्रीसाठी आले होते. ही माहिती प्राप्त होताच या पथकाने तिथे साध्या वेात पाळत ठेवून या दोन्ही पती-पत्नीला अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी चार लाखांचे हेरॉईन, दोन मोबाईल व एक मिक्सर ग्राईडर जप्त केले आहेत. या चारही आरोपींना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.