मुंबई

कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबबंदी; निर्णय राखीव

Shambhuraj Pachindre

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कॉलेज कॅम्पसमधील हिजाबबंदी ड्रेसकोडचा भाग आहे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखविण्याचा कोणताही हेतू नाही, असा दावा चेंबूरच्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयाने बुधवारी उच्च न्यायालयात केला; तर मुस्लिम विद्यार्थिनींना आतापर्यंत हिजाब, नकाब, बुरखा परिधान करून वर्गात बसण्यास मुभा होती, मग अचानक हिजाबवर बंदी का घातली? असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. तो 26 जूनला देण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT