मुंबई

मुंबईत मुसळधार : अंधेरी सबवे मार्गावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईत पश्चिम उपनगरात गेल्या एक ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवे मार्गावर पाणी भरल्यामुळे हा सबवे वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सबवे बंद असल्यामुळे अंधेरी पूर्वेला सबवे बाहेर एक ते दीड तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणारा सबवे हा सखलभागात आहे. अंधेरी सबवेखाली दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी व नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर पालिकेच्या कर्मचारी आणि मुंबई पोलिसांच्या वतीने बॅरिकेट लावून सबवे पूर्णपणे बंद केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT