H-1B visa | एच-1 बी व्हिसामुळे शेअर निर्देशांकांना फटका Pudhari File Photo
मुंबई

H-1B visa | एच-1 बी व्हिसामुळे शेअर निर्देशांकांना फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अमेरिकेने एच-1 बी व्हिसावर एक लाख शुल्क लागू केल्याचे पडसाद सोमवारी (दि. 22) भारतीय शेअर बाजारावर उमटले. आयटी कंपन्यांच्या शेअर विक्रीचा मारा झाल्याने सेन्सेक्स 466 आणि निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी घसरला.

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 0.56 टक्क्याने घटून 82,159 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.49 टक्क्याने घटून 25,202 अंकांवर स्थिरावला. टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, सिप्ला, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ट्रेंट आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर भावात एक ते तीन टक्क्यांनी घसरण झाल्याने निफ्टीला झळ बसली.

स्टील उद्योगावर युरोपियन संकट

अमेरिकन शुल्कवाढीमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसणार असल्याचे सरकारी अधिकारीही मान्य करत आहेत. त्यातच आता युरोपियन कार्बन शुल्काची अंमलबजावणी शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे.

केंद्र सरकार विकणार सहा कंपन्यांतील हिस्सा

चालू आर्थिक वर्षात सरकार सहा सरकारी कंपन्यांमधील हिस्सा कमी करणार आहे. युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसीतील हिस्सा कमी केला जाणार आहे. कमीत कमी सार्वजनिक गुंतवणुकीचा नियम पाळण्यासाठी सरकार आपला हिस्सा कमी करणार आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक 1.6 अब्ज डॉलरवर

आशिया पॅसिफिकमधील 9 बाजारपेठांमध्ये रिअल इस्टेट गुंतवणूक 71.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानसह भारत विदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाणे ठरत आहेत. भारताने गुंतवणुकीसाठी आशादायक देश म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.

एच-1 बी व्हिसा शुल्कवाढीचा भारतीय कंपन्यांना कमी फटका

अमेरिकेने एच-1 बी व्हिसाच्या शुल्कात केलेल्या वाढीमुळे भारतीय आयटी कंपन्यांना तुलनेने कमी फटका बसेल. अमेरिकेत काम करणार्‍या भारतीयांचे प्रमाण 14,792 वरून 10,162 वर आल्याची माहिती नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT