महामुंबईतील घरांच्या विक्रीत पहिल्या तिमाहीत घट  pudhari photo
मुंबई

Housing market slump Mumbai : महामुंबईतील घरांच्या विक्रीत पहिल्या तिमाहीत घट

नव्या घरांचा सर्वाधिक पुरवठा; तरी फक्त 32 हजार 800 घरांची विक्री

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशभरातील गृहविक्रीचा विचार करता यावर्षी महामुंबईत सर्वाधिक घरांची विक्री झाली. 2026च्या पहिल्या तिमाहीत 32 हजार 800 घरांची विक्री झाली; मात्र गेल्या वर्षअखेरीस झालेल्या 34 हजार 725 घरांच्या विक्रीच्या तुलनेत यावर्षी गृहविक्रीत 6 टक्क्यांनी घट झाली.

गेल्या तीन महिन्यांत देशभरातील 7 महत्त्वाच्या शहरांमध्ये 1 लाख 26 हजार 265 घरांची विक्री झाली. त्यापूर्वीच्या 3 महिन्यांत 1 लाख 23 हजार 835 घरांची विक्री झाली होती. तसेच 2025च्या पहिल्या तिमाहीत 1 लाख 20 हजार घरांची विक्री झाली होती. 2025च्या तुलनेत यावर्षी 26 टक्क्यांनी तर गेल्या वर्षअखेरचा विचार करता यावर्षी 2 टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमध्ये महामुंबईचा मोठा वाटा आहे, असे ॲनारॉकच्या अहवालात म्हटले आहे.

महामुंबईत अपेक्षाभंग

महामुंबईच्या दृष्टीने मात्र 2026ची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत महामुंबईत 34 हजार 725 घरांची विक्री झाली होती. त्यानंतर 6 टक्क्यांनी घट होऊन जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत 32 हजार 800 घरांची विक्री झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत पुण्यात 17 हजार घरांची विक्री झाली होती तर यावर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत केवळ 15 हजार 300 घरांची विक्री झाली. म्हणजेच 10 टक्क्यांनी घट झाली.

नवे गृहप्रकल्प बाजारात

2026 च्या पहिल्या तिमाहीत महामुंबई आणि बंगळुरूमध्ये नवीन घरांचा सर्वाधिक पुरवठा झाला. प्रमुख 7 शहरांमधील एकूण नवीन प्रकल्पांपैकी 51 टक्के वाटा या दोन शहरांचा होता. तिमाही आधारावर महामुंबईमध्ये नवीन पुरवठ्यात 6 टक्के वाढ दिसून आली, तर याच कालावधीत बंगळुरूमध्ये 7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या शहरांमध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात तिमाही घट दिसून आली जी अनुक्रमे 28 टक्के, 17 टक्के, 10 टक्के आणि 9 टक्के इतकी होती. इतर शहरांमध्ये नवीन प्रकल्पांच्या संख्येत तिमाही वाढ झाली, ज्यामध्ये हैदराबादने सर्वाधिक 46 टक्के तिमाही वाढ नोंदवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT