मेगाब्लॉक  File Photo
मुंबई

आज रात्री गोरेगाव- मालाडदरम्यान ब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामासाठी आज, सोमवार ३० सप्टेंबर रोजी गोरेगाव ते मालाड स्थानकांदरम्यान नाईट ब्लॉक (Mumbai Local Train Update) घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकल वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय १५० ते १७५ लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

गोरेगाव स्थानकात अप-डाऊन जलद मार्गावर आणि मालाड स्थानकात अप-डाऊन जलद, तसेच धिम्या मार्गावर रात्री साडे बारा ते मंगळवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते अंधेरी आणि बोरीवली ते विरारदरम्यान लोकलची वाहतूक सुरु राहणार आहे. अंधेरी ते बोरीवली दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील मेल एक्सप्रेस १० ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. याशिवाय काही लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट, रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी विरार येथून एक जादा लोकल बोरिवलीकरिता, तर बोरीवलीतून पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी चर्चगेटकरिता स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. (Mumbai Local Train Update)

१५० ते १७५ लोकल रद्द

सोमवारपासून ५-६व्या रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी राममंदिर-गोरेगाव- मालाड दरम्यान अप-डाऊन जलद आणि धिम्या मार्गावर प्रतितास ३० किमी वेगाचे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे सुमारे १५० ते १७५ लोकल रद्द केल्या जाणार आहेत. ४ ऑक्टोबरनंतर ब्लॉक कालावधी वगळता उपनगरीय लोकलची सेवा सुरळीत सुरु होणार आहे. तसेच गोरेगाव स्थानकात लूप लाईनच्या अनुपलब्धतेमुळे सकाळच्या लोकल रद्द असणार आहेत.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकलची वाहतूक

रा. ११.२७ चर्चगेट-विरार, रा. १ वा. चर्चगेट-अंधेरी, रा. ११.३० वा. विरार-चर्चगेट, रा. १२.१० वा. बोरीवली-चर्चगेट, रा. १२.०७ वा. गोरेगाव- सीएसएमटी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT