गोरेगावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट 
मुंबई

Goregaon gas blast : गोरेगावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

तिघे गंभीर जखमी, भिंत कोसळली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कांदीवलीतील सिलिंडर स्फोटात होरपळलेल्या सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना गोरगाव येथे बुधवारी अशीच दुर्घटना घडली. शहीद भगत सिंग नगरातील राजाराम चाळीत सकाळी 7.42 च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात तीनजण होरपळले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

गुल मोहम्मद अमीन शेख (38) यांची प्रकृती चिंताजनक असून मालती देवी (28) या 30 ते 35 टक्के भाजल्या आहेत. तर सरजन अली जावेद शेख (37) यांचे दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या दुर्घटनेत या घराचे मोठे नुकसान झाले असून घराची भिंतही कोसळली आहे. दरम्यान, घरात असलेल्या प्लास्टिकमुळे आणि अन्य ज्वलनशील वस्तूमुळे आग पसरली.

स्थानिकांनी जखमी तिघांनाही नजीकच्या एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, सरजन अली जावेद शेख आणि गुल मोहम्मद अमीन शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याना बोरिवलीतील गणेश रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर मालती देवी यांना पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या चाळीतील खोली क्रमांक 180 मध्ये ही घटना घडली. सकाळी सिलिंडरमधून गळती होत होती. मात्र घरातील सदस्यांच्या हे लक्षात आले नाही. काही मिनिटांतच स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराची भिंत क्षणार्धात कोसळली. त्यांनतर आसपासच्या नागरिकांनी मदतकार्य हाती घेत आगीवर पाण्याचा मारा करीतआग आटोक्यात आणली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत केला व आग विझवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT