सोनेदराचा उच्चांक file photo
मुंबई

Gold Rate Update | सोनेदराचा उच्चांक

पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबईः राजेंद्र पाटील

सणांच्या पार्श्वभूमीवर ज्वेलर्स आणि विविध संस्थांकडून सोन्याची मागणी वाढल्याने सोमवारी दराने उच्चांक गाठला. शुद्ध सोन्याचा प्रतिदहा ग्रॅम दर ७८,७०० रुपयांवर गेला. येत्या दिवाळीपर्यंत हा दर ८० हजार पार जाण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर गेल्या चार दिवसांत तोळ्यामागे एक हजार रुपयांनी वाढले. तीन दिवसांपूर्वी ७७ हजार ५०० रुपये तोळे सोन्याचा दर होता. सोमवारी तो ७८,५०० रुपये झाला. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊन सोने प्रतितोळा ८० हजार रुपये पार जाईल.

  • • दिवाळीत सोन्याचे दर जाणार

  • तोळ्याला ८० हजार पार

  • मुंबईत २० लाख लग्ने

  • • मुंबईत ६०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता

मुंबई यंदा २० लाख विवाह अपेक्षित असून तब्बल ६०० कोटींची उलाढाल होईल, अशी माहिती इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली. सोन्याची चढ-उतार गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या तीन दिवसात सराफ बाजारात सोन्याची चढ-उतार झाली असून सोने प्रतितोळे १ हजार रुपयांनी महाग झाले. मात्र सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी सोन्याचा दर प्रतितोळे ७७,५०० रुपये होता. आज सोमवारी हाच दर ७८,५०० रुपये तोळे झाला. म्हणजेच १ हजार रुपये प्रतितोळे सोने महाग झाले. शिवाय तीन टक्के जीएसटी आणि ६०० रुपये घडणावळ असे मिळून एक तोळे सोने ८१,४५५ रुपये प्रतितोळे होते. दिवाळीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असून तोळ्याचा भाव ८० हजार रुपये पार जाईल. म्हणजे जीएसटी आणि घडणावळ धरून एक तोळे सोने ८३,००० रुपये होण्याची शक्यता कुमार जैन यांनी वर्तवली आहे. मुंबईत यंदा २० लाख लग्नसोहळे होणार असल्याने सराफ बाजारात ६०० कोटींची मोठी उलाढाल होईल, असे जैन म्हणाले, तर चांदीचे दर किलोला आज सोमवारी ९५,००० रुपये होते. चांदी ही किलोमागे ३ हजार रुपयांनी महागली.

दरम्यान, आशियाई बाजारात सोन्याचा प्रतिऔंस (२८.३४ ग्रॅम) दर २,६७१.५० डॉलरवर गेला आहे. भारतीय चलनात ही रक्कम २ लाख २४ हजार रुपये होते. भारतात सणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाची ठिणगी पडल्यानेद- खील सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT