Girgaon Water Crisis Pudhari
मुंबई

Girgaon Water Crisis: टँकर माफियांनी पाण्याचे दर वाढवल्याने गिरगावकर हैराण

सहा हजार लिटरच्या टँकरमागे मोजावे लागतात तेरा हजार रुपये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऐन उन्हाळ्यात वीज आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे संकटात सापडलेल्या गिरगावकराना आता टँकर माफियांना सुद्धा टार्गेट केले आहे. अचानक दर वाढवून लोकांना वेठिस धरायच काम टँकर माफियानी सुरू केले आहे. ६ हजार लिटर पाण्याचा टँकर मागे ५ हजार रुपये तर १० हजार लिटर टँकरचे दर थेट १३ हजार रुपयेपर्यंत वाढवले आहेत.

एवढे करून लोकांना प्यायचे पाणी नशिबात नसल्याने प्रत्येकाला बिसलरी वॉटर इत्यादी कंपन्यांचे पाणी वेगळे आणि विकत मागवावे लागत आहे. पाण्यासाठी दिवसाकाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असल्यामुळे गिरगावकरांना याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे पाऊस आलाच नाही तर पुढे काय होणार पाण्याशिवाय कसे दिवस काढणार अशा विचाराने महिला वर्ग खूपच चिंतित झाला आहे.

महापालिका, बेस्ट अभियंते आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांनी मिळून रस्त्याच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारामुळे गिरगावकरांवर हे वाईट दिवस आल्याने विरोधकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे.

गिरगावकरांचे जनजीवन आता टँकर बिसलेरी आणि विहिरींच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.नळाला येणारे बी एम सी चे पाणी १० ते १५ मिनिटे बंद होत आहे. कमी दाबाने येणारे पाणी घरातले जेवण सर्वांच्या आंघोळी , देवपूजा ,धुणी भांडी करतानाच संपत आहे. पाणी कमी येत असल्यामुळे दोन दोन तीन दिवस कपड्यांचा एकच जोड वापरून दिवस काढावे लागत आहे.

वापरलेले कपडे लॉन्ड्री वाल्याकडे धुवायला टाकावे लागत असल्यामुळे त्याचा देखील आर्थिक फटका गिरगावकरांना बसत आहे. स्थानिक राजकारण्यनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांना आणखीन किती दिवस हा भुर्दंड सोसावा लागणार अशी विचारणा स्थानिकांकडून सरकारला केली जात आहे.

गिरगावकरांवर आलेल्या ह्या वाईट दिवसांचा फायदा कसा घ्यायचा हे ठरवून आता टँकर माफिया चौपट दराने टँकरचे पाणी विकू लागले आहेत. प्रत्येक टँकर वाल्याने आपल्या कंपनीचे नाव, नंबर गुगल वरती आधीच अपलोड केले आहे. परंतु फोन लावल्यावर टँकरच्या दरांविषयी फार कमी बोलत आहेत. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र पाण्याचे टँकरचे दर चौपट वाढवून नागरिकांना सांगत आहे.

पालिका देखील पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी पुरवण्यास काम करत असते परंतु त्या बाबतीत पालिकेची सेवा कुठेतरी खूपच तुकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच लोक खाजगी टँकर चालकांकडून पिण्याचे पाणी मागवत आहेत. टँकर माफिया आता पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने पाणी विकू लागले आहे.

टँकर बंद आंदोलन

एकीकडे उन्हाळा टोकावर आल्यामुळे भूजल पातळी खालावल्याची कारण नागरिकांना देऊ लागली आहे.सत्तेत बसलेले लोकप्रतिनिधी काही विरोधक यांच्यापैकीच काही जण टँकर चालकांबरोबर भागीदारीत असल्यामुळे टँकर चालक बिनधास्त झाले आहेत. ज्या पालिकेने टँकर चालकांना मुंबई पोट भरायला व्यवसाय दिला त्या पालिके विरोधातच सोमवारपासून टँकर बंद आंदोलन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT