Girgaon Kelewadi bridge Pudhari
मुंबई

Girgaon Kelewadi bridge: पुलाऐवजी लिफ्ट; गिरगावकर संतप्त; 6 वर्षे लढा देऊनही केळेवाडीच्या पुलाला मुंबई महापालिकेकडून तिलांजली

दोन ते तीन वेळा निविदा काढून ठेकेदार देखील नेमण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पाच पावलांचा असलेला गिरगावातील केळेवाडीचा पादचारी पूल बांधण्यासाठी महापालिकेने सहा वर्षे घालवली. आता पादचारी पुलाऐवजी तेथे लिप्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. यामुळे गिरगावकरांसह रेल्वे प्रवाशांचाही भ्रमनिराश झाला असून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सहा वर्षांपूर्वी गिरगावच्या केळेवाडीतून चर्नीरोड रेल्वे स्थानकाला जाणारा केळेवाडीचा हा लहानसा पूल अचानक मध्यरात्री धोकादायक घोषित करून जमीनदोस्त केला. यानंतर पूल उभारण्यासाठी स्थानिकांना अनेक वेळा सह्यांची सहयांच्या मोहिमा राबववाव्या लागल्या. आंदोलनही करावे लागले. त्यानंतर सहा वेळा या पुलाचा शुभारंभ करण्यात आला.

दोन ते तीन वेळा निविदा काढून ठेकेदार देखील नेमण्यात आले. बांधकाम सुरू होताच जवळच्या सैफी रुग्णालयाकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही परवानगी दिली.

मात्र सहा वर्षे हा पाच पावलांचा पूल काही उभा राहू शकला नाही. आता अचानक लिप्ट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गिरगावकरांसह प्रवाशांचु गैरसोय होणार असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात राजकारण करण्याऱ्यांची नावे आम्ही नक्कीच उघड करू असा इशाराही गिरगावकर देत आहेत.

काम थांबवणारे हात

प्रथम सैफी रुग्णालय प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली, मात्र पूल नागरिकांसाठी महत्त्वाचा असल्याने न्यायालयाने बांधकामाला परवानगी दिली. नंतर वाहतूक विभागाने काही काळ काम थांबून ठेवले. मात्र नागरिकांचा दबाव पाहता त्यांना परवानगी द्याव लागली. नंतर पिलरचे काम सुरू होत नाही तोच पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केल्याचे सांगून बांधकामात खोडा घालण्यात आला.

सहा वर्षे पुलाचे काम न करू शकणाऱ्या प्रशासनाने अवघ्या दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करीत लिप्ट उभारणी सुरू केली. पालिकेची एवढी घाई कोणासाठी? ह्या दोन्ही लिफ्ट मागच्या बाजूला आहेत. सैफी हॉस्पिटलीच्या सांगण्यावरूनच हे काम होत आहे.
- दीपक तळेकर, गिरगावकर
गिरगावच्या मध्यभागी राहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. केळेवाडीचा पूल पाडल्यापासून महर्षी कर्वे मार्ग ओलांडताना असंख्य रेल्वे प्रवासी आणि गिरगावकरांचे अपघात घडले आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी मात्र पुलाचे राजकारण करून आपले खिसे भरत आहेत. यांच्या कुटुंबातील मंडळी केळेवाडीतून ये-जा करत नाहीत का ? इतरांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांना जाणवत नाहीत का ?
- पूनम शिंदे, गिरगावक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT